महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra emblem

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत सोनजांब

Gram Panchayat Sonjamb

गावाची माहिती

सोनजांब हे गाव सरस्वती नदीच्या काठावरती वसलेले आहे.गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 3388 इतकी असून मूळ व्यवसाय शेती आहे.गावापासून साधारण 02 किमी अंतरावर तिसगाव धरण आहे व सोंनजांब फाट्यावरती सुला वाईन कंपनीचे निर्मिती प्रकल्प व विक्री केंद्र आहे.त्यामुळे गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध होतो.गावात सर्वेस्वर महादेव मंदिर ,ग्रामदैवत महारुद्र हनुमानाचे मोठे मंदिर असून मार्च महिन्यात गावात यात्रोत्सव होतो व नागपंचमी सणाच्या दिवशी धार्मिक सप्ताह बसतो तसेच गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होत असतात तसेच गावाच्या भौगोलिक क्षेत्रात 3 बंधारे देखील आहेत त्यात मत्स्यव्यवसाय केला जातो त्यातून ग्रामपंचायतला उत्पन्न मिळते तसेच गावात सहकारी सोसायटी पतसंस्था व राष्ट्रीय बँक देखील आहेत.

भौगोलिक माहिती – सोनजांब

क्र. क्षेत्र हेक्टर
1शेती क्षेत्र१९४
2गायरान (निसर्ग क्षेत्र)५३
3घरकुल क्षेत्र

लोकसंख्येची माहिती (२०११ जनगणना) – सोनजांब

विभाग संख्या
एकूण लोकसंख्या३३८८
पुरुष१७५७
स्त्रिया१६६१
अनुसूचित जाती५१७
अनुसूचित जमाती१७५
इतर२६९६

घरांची माहिती – सोनजांब

प्रकार संख्या
गावातील एकूण घरसंख्या५१५
राशन कार्ड धारकांची संख्या५१३
अंत्योदय कार्ड संख्या
बीपीएल कार्ड संख्या१२

सदस्यांचे वर्गीकरण – ग्रामपंचायत सोनजांब

प्रकार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय सर्वसाधारण
पुरुष सदस्य00010303
स्त्री सदस्य01010202
एकूण सदस्य – 12

इतर संस्थांची माहिती

घटक तपशील
महिला बचत गटाचे नावमहादेव महिला स्वयं सहाय्यता बचत गट
अध्यक्षाश्रीमती माला हरीभाऊ खुळे
सचिवश्रीमती ललिता अशोक बागुल

मतदान केंद्र माहिती

मतदान केंद्र क्रमांक
248 / 169

जन्म, मृत्यू, उपजत व विवाह नोंदी

जन्म मृत्यू उपजत विवाह
05050002

ग्रामपंचायत कर आकारणी

क्र. बाब संख्या
1एकूण नवीन व विद्यमान घरांची संख्या654
2गावातील घरांची संख्या515
3त्यातील मंदिरे, सरकारी इमारती34
4शिवारातील घरांची संख्या105
5गावातील एकूण नग घरांची संख्या230

ग्रामपंचायत कर मागणी

क्र. बाब मागील चालू एकूण
1घरपट्टी22,03229,85451,886
2जल. सफाई6,2006,20012,400
3दिवाबत्ती6,0006,00012,000
4पाणीपट्टी9,3009,30018,600
5स्म. पाणीपट्टी24,60026,45051,050
6एकूण मागणी68,13287,0371,55,169

लाभार्थी (सन 09/10 पर्यंत दिलेले)

एकूण लाभार्थी संख्या
48

ग्रामपंचायत विकास कामे – सोनजांब

क्र. काम तपशील
1प्र. प. कार्यालयीन इमारतग्रामपंचायतीच्या निधीतून बांधकाम व उपयोगी उपकरणे घेतली आहेत. सध्याचे कामकाज ग्रामपंचायत इमारतीत चालते.
2पाणी पुरवठा योजनाग्रामपंचायतीच्या निधीतून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विहिरी व वीजपंपाद्वारे गावात पाणी पुरवठा होत आहे.
3के. टी. वेअर बंधाराजलसंपदा विभागाच्या योजनेनुसार बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा झाला आहे.
4सामुदायिक मंदिरग्रामपंचायतीच्या निधीतून बांधकाम केलेले. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी उपयोगी.
5अंगणवाडी इमारतजिल्हा परिषद व ग्रामपंचायत निधीतून ३ अंगणवाड्या बांधल्या आहेत. गावातील लहान मुलांना अन्न, शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
6पाण्याची टाकीपिण्याच्या पाण्याच्या वितरणासाठी उभारलेली टाकी व फिल्टर प्लांट कार्यरत आहेत. यामुळे गावातील सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा होतो.
7गटरगावातील ९०% गटर बांधणी पूर्ण झाली आहे. स्वच्छतेसाठी व पाणी व्यवस्थेसाठी उपयोगी ठरले आहे.
8शौचालयेस्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यामुळे गाव पूर्णपणे शौचमुक्त झाले आहे.
9घरकुलप्रधानमंत्री आवास योजनेतून सन 2015/2016 पासून आजपर्यंत ८२ लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत.
10स्मशानभूमीस्मशानभूमीचे विकास काम करण्यात आले आहे – कंपाऊंड भिंत, प्रवेशद्वार, सिमेंट बेंच व शेड. ग्रामपंचायत व पंचायत समिती निधीतून हे काम पूर्ण झाले आहे.
11सामुदायिक मंदिर बांधकामदलित समाजासाठी स्वतंत्र सामुदायिक मंदिर बांधले आहे, जिथे विवाह, कार्यक्रम व धार्मिक उपक्रम घेतले जातात.
12प्राथमिक शाळा इमारतग्रामपंचायत व पंचायत समितीच्या मदतीने प्राथमिक शाळेची इमारत बांधली. आजही शैक्षणिक सुविधा पुरवल्या जात आहेत.
13प्राथमिक शाळा वॉल कंपाऊंडजिल्हा परिषद व पंचायत समिती निधीतून वॉल कंपाऊंड बांधले गेले, यामुळे शाळेची सुरक्षा व रोजगार निर्मिती झाली.
14किचन शेडसंपूर्ण रोजगार योजनेतून प्राथमिक शाळेत किचन शेड बांधले गेले. विद्यार्थ्यांना भोजन सुविधा दिल्या जातात.
15बेंच (बाकडे)प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करून दिली. पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निधीतून शाळा सुधारण्यात आली.
16स्वागत कमानग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान बांधण्यात आली. ग्रामपंचायत निधी व सभासदांच्या सहकार्याने हे काम पूर्ण झाले. उद्घाटन 02/02/2016 रोजी झाले.
17अंगणवाडी इमारतसोनजांब येथे ८ अंगणवाड्या असून त्यात ३ अंगणवाड्यांचे स्वतंत्र इमारतीत रूपांतर झाले. गावातील मुलांना अन्न, आरोग्य व शिक्षण सुविधा पुरवल्या जात आहेत.
18प्राथमिक शाळा इमारतजिल्हा परिषदेच्या निधीतून प्राथमिक शाळेची इमारत बांधली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवल्या जात आहेत.
19रा. स. वाघ माध्यमिक विद्यालय, सोनजांबगावातील विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षणासाठी शाळा उपलब्ध. ८वी ते १०वी पर्यंतचे वर्ग आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून निधी मिळतो.
20ग्रामपंचायत कार्यालय इमारतग्रामपंचायत कार्यालया साठी स्वतंत्र इमारत बांधली जात आहे. सभासद व नागरिकांच्या सहकार्याने निधी उभारला. लवकरच नूतनीकरण व पूर्णत्वास येईल.
21पाणी शुद्धीकरण प्रकल्प व आर. ओ. प्लांटग्रामपंचायतीच्या निधीतून पाणी शुद्धीकरण प्रकल्प व आर. ओ. प्लांट सुरू असून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी दिले जात आहे.
22सी.सी.टीव्ही कार्यान्वितग्रामपंचायतीच्या निधीतून संपूर्ण गावात CCTV बसवले. गावाची सुरक्षितता व देखरेख सुधारली.
23सामानभंडारग्रामपंचायतीतून भव्य सामानभंडार उभारले गेले आहे, जे विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमासाठी वापरले जाते.
24सामानभंडार – 2२४ वा वित्त आयोग निधीतून आणखी एक सामानभंडार उभारले गेले. विवाह, धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी नागरिकांना सुविधा उपलब्ध आहेत.